पुरग्रस्तांच्या आरोग्य तपासणीसाठी मुंबई ,पुणे आणि यवतमाळवरून पथके दाखल

दहा हजार रुग्णांची केली तपासणी
कोल्हापूर – महापुरानंतर खरा प्रश्न आहे तो आरोग्याचा…त्यामुळंच कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल मध्ये पुरग्रस्तांचा अंतररुग्ण विभाग उभारण्यात आला आहे. याठिकाणी जवळपास 90 पेक्षा अधिक बेड सज्ज केले असून सर्वप्रकारची औषधाचा साठा उपलब्ध झाला आहे. तसंच कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करण्यासाठी 100 पेक्षा अधिक डॉक्टरांची फौज सध्या शहरात तपासणी करत आहे.
गेल्या 48 तासापासून दहा हजार पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्यासह अनेक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सीपीआरमध्ये पूरग्रस्तांच्या उपचारासाठी दाखल झाले आहेत. सध्या साठहून अधिक अधिक पेशंट रुग्ण या पूरग्रस्त कक्षामध्ये उपचार घेत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपचारासाठी राज्यातील मुंबई, पुणे, बीड ,यवतमाळसह इतर जिल्ह्यातूनही वैद्यकीय पथके कोल्हापुरात दाखल झाले आहेत.





