हर हर महादेव ! 40 दिवसांत तब्बल इतके कोटी भाविक महाकाल दरबारात लिन..

नवी दिल्ली – उज्जेन येथील सुप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. श्री महाकालेश्वर मंदिरात महाकाल बाबांच्या दर्शनासाठी पहाटे ६ वाजण्यापूर्वीच दर्शनार्थ्यांच्या रांगा लागतात. मग आरती, भजनात भक्त दर्शनामध्ये तल्लीन होतात.
श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रशासक संदीपकुमार सोनी म्हणाले की, श्री महाकालेश्वर मंदिरात दररोज साधारणपणे दीड ते दोन लाख भाविक भगवान श्री महाकालेश्वराचे दर्शन घेतात. विशेष सणासुदीचे दिवस आणि सुटीच्या दिवशी भाविकांची संख्या सतत वाढत असते. सोनी म्हणाले की, १ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत उज्जैनमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या अंदाजे १ कोटी २३ लाख असून या भाविकांनी भगवान श्री महाकालेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने भगवान श्री महाकालेश्वरजींचे अल्पावधीत दर्शन व्हावे यासाठी चोख व्यवस्था केली आहे.
३१ डिसेंबर २०२३ आणि १ जानेवारी २०२४ रोजी चालित भस्म आरतीमध्ये ४५ हजार भाविकांनी श्री महाकालेश्वर भगवानांचे दर्शन घेतले आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री शन आरतीपर्यंत सुमारे 8 लाख 10 हजार भाविकांनी श्री महाकालेश्वर भगवानांचे दर्शन घेतले.
तर १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागातून तसेच ग्रामीण भागातील भाविक श्री महाकालेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे १७ ते २२ जानेवारी या कालावधीत अयोध्या येथील पवित्र भूमीवर श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.




