Kunickaa Sadanand : ‘PM केयर फंडात 9000 कोटी’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा PM मोदींना थेट सवाल, म्हणाली “bjp पक्ष भ्रष्ट नेत्यांसाठी वॅाशिंग मशिन”
Kunickaa Sadanand : आता कुनिकाने पीएम केअर्स फंडाबद्दल चिंता व्यक्त करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Kunickaa Sadanand : अभिनेत्री कुनिका सदानंदने झारखंडमधील भरती परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. तिने नुकतीच रांचीच्या जयपाल सिंग मुंडा स्टेडियममधील आंदोलनस्थळी भेट दिली आणि उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याअगोदर जंतर मंतर येथील आंदोलनावर तिने मत व्यक्त करताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.
खरंतर अभिनेत्री कुनिका सदानंद आपली भूमिका प्ररखडपणे मांडताना दिसते. ज्या मुद्यांवर तिला आक्षेप आहे, त्यावर ती बेधडक भाष्य करत सरकारला थेट प्रश्न विचारते. आता कुनिकाने पीएम केअर्स फंडाबद्दल चिंता व्यक्त करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कुनिका सदानंदने एक्सवरुन लिहिले, “तर आता आपल्याला माहित आहे की पीएम केअर्स फंडात अंदाजे ९,००० कोटी आहेत. म्हणून आपले ‘माननीय’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी माझी एक सूचना आहे: तुम्ही आणि तुमचा पक्ष भ्रष्ट राजकारण्यांसाठी ‘वॅाशिंग मशिन’ सारखे काम करत आहात.” अशा शब्दांत टीका केली आहे.
Ok so now we know that there is almost 9000crs in the PMcares fund. So here is my suggestion to our questionably Hon’ble PM @narendramodi ji , you and your party hv been a laundry machine for corrupt netas, so how about to whitewash/clean this money that sits in your PM Cares…
— Kunickaa Sadanand (@Kunickaa) August 19, 2026
ती पुढे म्हणाली, “पीएम केअर्स फंडात जमा झालेले हे पैसे ‘स्वच्छ’ करून गावांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये शाळा बांधण्यासाठी किंवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी का वापरले जात नाहीत?” यामध्ये शौचालये बांधणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे आणि त्या शाळांपर्यंत जाणारे पक्के रस्ते बांधणे यांचाही समावेश असू शकतो. विशेषतः गेल्या दोन वर्षांत कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी तुम्ही या निधीचा वापर केलेला नाही, हे लक्षात घेता हे करणे नक्कीच शक्य आहे. आणि हो, हे पैसे तुमचे जवळचे साथीदार आणि ‘बुद्धीहीन अंधभक्त’ हडपणार नाहीत, याचीही काळजी घ्या. काय म्हणता? असा खोचक टोलाही अभिनेत्रीने लगावला आहे.
कुनिका सदानंदचे चित्रपट आणि टीव्ही शो
अभिनेत्री कुनिका सदानंद मनोरंजविश्वातील सतत चर्चेत असलेले नाव आहे. तिने अनेक हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. खिलाडी, बेटा, गुमराह, किंग अंकल, मोहरा, कोयला, प्यार किया तो डरना क्या, हम साथ साथ हैं आणि पेज ३ या चित्रपटातील छोट्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिका तिने निभावल्या आहेत. दूरदर्शन मालिकांमध्ये स्वाभिमान, अदालत, दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स, अकबर बिरबल आणि काल भैरव रहस्य यांचा समावेश आहे. ती बिग बॉस १९ मध्ये स्पर्धेक म्हणून सहभागी झाली होती. ती यूट्यूबवर स्वतःचा पॉडकास्ट चालवते.
MPune Crime News: अनैतिक संबंधांच्या संशयातून झालेल्या खून प्रकरणातून तरुणाची निर्दोष मुक्तता






