स्थलांतरीत मजुरांना आंतरराज्य प्रवासाला बंदी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास बंदी घातली आहे. नुकतीच गृह मंत्रायलाने याबाबतची एक मार्गदर्शक सूचना जारी करत सर्व राज्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहे. तसेच जे मजूर ज्या कोणत्याही राज्यात अडकले आहेत, त्यांनी तिथेच राहावं, असेही या परिपत्रकात म्हटलं आहे.
स्थानिक सरकाने राज्यात त्यांना काम उपलब्ध करुन द्यावं, असेही या नमूद करण्यात आलं आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान कोणालाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही.
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक स्थलांतरित मजूर पायी चालत आपापल्या गावी निघाले होते. या पार्श्वभूमीवर नुकतंच केंद्र सरकारच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर स्थलांतरित मजुरांबाबत केंद्र सरकारकडून निर्देश जारी करण्यात आले.
यानुसार, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कोणत्याही मजुरांना राज्याच्या बाहेर पाठवता येणार नाही. त्या मजुरांनी त्या ठिकाणी राहूनच काम करावे. तसेच जे मजूर मदत केंद्रात आहे. त्यांच्या कौशल्यांचा वापर करुन घ्यावा, असेही यात नमूद केलं आहे.





