SSC Result: मुक्तांगण इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के
SSC Result: एकूण ३४० विद्यार्थ्यांपैकी तब्बल १७९ विद्यार्थ्यांनी 'विशेष प्राविण्य' मिळवले आहे. तसेच ९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत.

SSC Result: पुणे विद्यार्थी गृहाच्या सहकारनगर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आपला शंभर टक्के निकालाचा दबदबा कायम राखला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत शाळेचे सर्व ३४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, भूमी देशपांडे हिने ६०० पैकी ४९४ गुण (९८.८०%) मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याखालोखाल ईरा सरदे ९८ टक्के गुणांसह द्वितीय आली, तर सिम्रन देशपांडे, आर्या प्रभुदेसाई आणि पार्थ पवार या तिघांनी ९७.४० टक्के गुणांसह विभागून तिसरा क्रमांक पटकावला. चतुर्थ क्रमांकावर आदित्य खंडागळे आणि तीर्था जोतावर (९७.२०%) राहिले, तर पार्थ गोरे याने ९६.८० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला.
एकूण ३४० विद्यार्थ्यांपैकी तब्बल १७९ विद्यार्थ्यांनी ‘विशेष प्राविण्य’ मिळवले आहे. तसेच ९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक आनंद कुलकर्णी, प्राचार्या जयती नरवणे, पर्यवेक्षिका विजया काळे आणि गौरी राजगुरू आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.





