मोदींवरून भाजपवर टीका
Updated On:

मुंबई : आरेतील वृक्ष तोडीवरून पर्यावरणवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओचा दाखल देत भाजपवर टीका केली. आरेतील झाडांना जीव नाही का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बियर गिल यांच्यासोबत मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
लकडी जीव होता है, हम लकडी नहीं काट सकते, असे विधान मोदी यांनीया कार्यक्रमात केले होते. या व्हीडिओचा संदर्भ देत आरे वृक्षतोड प्रकरणावरुन मोदी आणि भाजपवर टीका केली जात आहे. आरेतील झाडांमध्ये जीव नाही का? असा सवाल केला जात आहे.
मोदी म्हणतात झाडांमध्येही जीव असतो, त्यामुळे झाडे कापू शकत नाहीत. मग आरेतील झाडे कापताना भाजपला काहीही वाटले नाही का, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.





