Uddhav Thackeray : बैठकीला अनुपस्थित असलेल्या खासदारांसाठी उद्धव ठाकरेंकडून मेसेज जारी; राजकीय वर्तुळात खळबळ
राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा एक खळबळजनक (Uddhav Thackeray) बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, पक्षाचे काही खासदार सध्या शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray : राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा एक खळबळजनक (Uddhav Thackeray) बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, पक्षाचे काही खासदार सध्या शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
हे खासदार लवकरच एकत्र येऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याची आणि त्याबाबत लोकसभा अध्यक्षांना अधिकृत पत्र देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.या संभाव्य राजकीय भूकंपाच्या (Uddhav Thackeray) पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी कमालीच्या वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत.
‘नंदनवन’वर ‘ऑपरेशन टायगर’च्या कायदेशीर बाबींवर चर्चा?
एकीकडे ठाकरे गटातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच, दुसरीकडे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी ‘नंदनवन’ बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या भेटीदरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या कायदेशीर आणि घटनात्मक बाबीं संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे. यामुळे ठाकरे गटाची धाकधूक कमालीची वाढली आहे.
ठाकरे गटाची खबरदारी; केवळ ४ खासदार बैठकीला हजर
या सर्व घडामोडी लक्षात घेता, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, पक्षाच्या एकूण ९ खासदारांपैकी केवळ ४ खासदारच या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले. उर्वरित ५ खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले.
जरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, “हे पाचही खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते,” असा दावा करून परिस्थिती सावरून नेण्याचा प्रयत्न केला, तरी संशयाचे ढग गडद झाले आहेत.
अनुपस्थित ५ खासदारांना उद्धव ठाकरेंचा थेट संदेश
बैठकीला प्रत्यक्ष हजर न राहिलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टिकर, संजय देशमुख आणि संजय जाधव यांचा समावेश आहे. या खासदारांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून जनतेत चुकीचा संदेश गेल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या लक्षात आले आहे.यावर तात्काळ उपाय म्हणून उद्धव ठाकरेंनी या पाचही खासदारांना एक विशेष संदेश (मेसेज) पाठवला आहे.
या संदेशात त्यांनी म्हटले कि “तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहू शकला नाही हे खरे असले, तरी तुमच्या अनुपस्थितीमुळे प्रसारमाध्यमांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून, तुम्ही सध्या जिथे कुठे असाल तिथून प्रसारमाध्यमांसाठी एक औपचारिक निवेदन जारी करा. त्यामध्ये तुम्ही बैठकीला का हजर राहू शकला नाही याचे कारण स्पष्ट करा आणि तुम्ही कायम माझ्यासोबत व शिवसेना ठाकरे गटासोबतच (Uddhav Thackeray) आहात, हे ठामपणे जाहीर करा.”
तसेच, या खासदारांना पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईत येऊन आपली वैयक्तिक भेट घेण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आता हे पाच खासदार उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर काय भूमिका घेतात आणि जाहीर निवेदन प्रसिद्ध करतात का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






