Petrol-Diesel Price : महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्ब फुटला.! LPG पाठोपाठ पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; खिशाला बसणार मोठी कात्री
महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला महागाईचा फटका बसला आहे, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे देखील दर समोर आले आहेत.

Petrol-Diesel Price : आज दि. १ जून आजपासून नवीन महिना सुरु झालं असून, देशात अनेक मोठ्या आर्थिक बदलांसह या नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर आणि प्रत्येकाच्या खिशावर होताना दिसणार आहे.
महिन्याच्या अगदी पहिल्याच दिवशी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला महागाईचा फटका बसला आहे, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे देखील दर समोर आले आहेत. (Petrol-Diesel Price)
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम भारताच्या इंधन आयातीवर होतो, कारण देश आपली मोठी गरज आयातीतून पूर्ण करतो. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पण पुढील काही दिवसांत इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
आखाती देशात सुरू असलेल्या तणावामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळेच किंमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधन दर स्थिर राहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आणि WTI क्रूडच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या ब्रेंट क्रूड सुमारे ९४ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचले आहे, तर WTI क्रूडमध्येही वाढ दिसून येत आहे. (Petrol-Diesel Price)
भारतातील पेट्रोल-डिझेल दर स्थिर : (Petrol-Diesel Price)
Mumbai
पेट्रोल: ₹111.21 / लिटर
डिझेल: ₹97.83 / लिटर
Delhi
पेट्रोल: ₹102.12 / लिटर
डिझेल: ₹95.20 / लिटर
Kolkata
पेट्रोल: ₹113.51 / लिटर
डिझेल: ₹99.82 / लिटर
Chennai
पेट्रोल: ₹107.77 / लिटर
डिझेल: ₹99.55 / लिटर
मागील महिन्यातील दरवाढीचा प्रभाव :
मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे ₹7.50 पर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही राज्यांमध्ये पेट्रोल ₹110 प्रति लिटरच्या पुढे गेले, तर अनेक राज्यांमध्ये डिझेल ₹100 प्रति लिटरच्या वर पोहोचले. त्या महिन्यात चार वेळा दरवाढ नोंदवण्यात आली होती, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला होता.
पुढील काळात इंधनाचे दर वाढणार का?
1) दरवाढीचा दबाव कायम राहू शकतो
आंतरराष्ट्रीय बाजारात जर कच्च्या तेलाच्या किंमती ९०–९५ डॉलरच्या वर स्थिर राहिल्या, तर भारतात पेट्रोल-डिझेल दर वाढण्याची शक्यता अधिक आहे.
2) भू-राजकीय तणाव महत्त्वाचा घटक
आखाती देशांतील तणाव, युद्धजन्य परिस्थिती किंवा पुरवठा अडथळे निर्माण झाल्यास कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि किंमती झपाट्याने वाढू शकतात.
3) सरकारी धोरणांचा परिणाम
भारत सरकार आणि तेल कंपन्या काही वेळा कर, सबसिडी किंवा दर स्थिरीकरण धोरणांचा वापर करून दरवाढ रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तात्काळ मोठी वाढ टाळली जाऊ शकते, पण दीर्घकालीन ट्रेंड जागतिक बाजारावर अवलंबून राहील.
4) ग्राहकांवर परिणाम
जर दरवाढ झाली, तर वाहतूक, वस्तूंची किंमत आणि महागाईवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः लॉजिस्टिक्स आणि कृषी क्षेत्रावर याचा अधिक भार पडू शकतो.
सध्या तरी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक तणाव पाहता पुढील काही दिवस इंधन बाजारासाठी संवेदनशील ठरू शकतात.







