Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (शिंदे गट) अकोला जिल्ह्यात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा अंतर्गत वाद समोर आला आहे. शिंदेसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आज आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (शिंदे गट) अकोला जिल्ह्यात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा अंतर्गत वाद समोर आला आहे. शिंदेसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आज आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजीनाम्याचे कारण
अश्विन नवले यांनी राजीनामा पत्रात (Maharashtra Politics) स्पष्टपणे म्हटले आहे की, पक्षातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या स्वार्थी आणि त्रासदायक वर्तनाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
काय लिहिले पत्रामध्ये?
“जय महाराष्ट्र, साहेब… सर्वप्रथम आपण विचारांची क्रांती केली, तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत. एका विचाराने पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे अकोला जिल्ह्यात काम केले. परंतू गोपीकिशन बाजोरिया (माजी आमदार) या अशा विचारहीन आणि स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे, आता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटणार नाहीये. आम्ही समाजसेवक आहोत व राहू. परंतू पक्षाच्या पदासाठी बाजोरिया यांचे गुलाम बनून राहू शकत नाही. त्यामुळं माझा हा राजीनामा आपण स्वीकार करावा. जय महाराष्ट्र.”
अश्विन नवले कोण आहेत?
अश्विन नवले हे अकोल्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. एकनाथ शिंदे यांच्या थेट आदेशानुसार त्यांची अकोला जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे अकोला पश्चिम, मूर्तिजापूर आणि अकोट या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
अकोला जिल्ह्यात शिवसेनेने दोन जिल्हाप्रमुख नेमले होते. यातील एक अश्विन नवले तर दुसरे विठ्ठल सरप यांच्याकडे अकोला पूर्व आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. या जबाबदारीच्या विभागणीमुळे नवले यांच्यात नाराजी निर्माण झाल्याचेही सूत्रांकडून समोर येत आहे.
पुढची भूमिका काय?
अश्विन नवले यांनी राजीनामा देताना भविष्यात (Maharashtra Politics) कोणत्या पक्षात जाणार किंवा त्यांची राजकीय भूमिका काय असेल, याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. सध्या ते फक्त “समाजसेवक” म्हणून काम करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. या राजीनाम्यामुळे शिंदेसेनेला अकोला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्हा पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नांमध्ये हा फटका मानला जात आहे.
पक्षाकडून अद्याप या राजीनाम्यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, अकोला शिवसेनेत अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचे वातावरण अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.






