Girija Prabhu and Mandar Jadhav : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जोडी तिसऱ्यांदा एकत्र झळकणार
Girija Prabhu and Mandar Jadhav : ‘कोण होतीस तू काय झालीस तू!’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची गिरिजा आणि मंदार यश-कावेरीच्या रुपात पडद्यावर दुसऱ्यांदा एकत्र आली.

Girija Prabhu and Mandar Jadhav : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका खूप लोकप्रिय ठरली. या मालिकेतील गौरी-जयदीप अर्थात गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची जोडीला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. गौरी-जयदीपची लोकप्रियता लक्षात घेऊन ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत सुद्धा या जोडीला दुसऱ्यांदा एकत्र कास्ट करण्यात आलं होतं.
‘कोण होतीस तू काय झालीस तू!’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची ही लाडकी जोडी यश-कावेरीच्या रुपात पडद्यावर दुसऱ्यांदा एकत्र आली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता ही जोडी तिसऱ्यांदा नव्या प्रोजेक्टद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
दोघांचा एकत्र फोटो शेअर करत मंदारने ही माहिती चाहत्यांसाठी शेअर केली आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने “पुन्हा एकदा लवकरच…” असे लिहिले आहे. गिरीजा-मंदारचा हा नवीन प्रोजेक्ट नेमका काय आहे याबद्दल अभिनेत्याने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. लवकरच याबद्दल कळवू असेही मंदारने पोस्टमध्ये लिहिलं आहे. Girija Prabhu and Mandar Jadhav :
नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये मंदार-गिरीजा म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र या दोघांची जोडी पुन्हा एकदा मालिकेत, म्युझिक अल्बममध्ये दिसणार, की चित्रपटात हे आता स्पष्ट होण्यासाठी चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. Girija Prabhu and Mandar Jadhav :
हेही वाचा:
Eye Structure: बोलके डोळे… रचना, कार्य आणि दृष्टीमागचं जाणून घ्या विज्ञान!





