Mrunmayi Deshpande : मृण्मयी देशपांडेची अनोखी ऑस्ट्रेलिया ट्रीप; चालत्या-फिरत्या घरातील प्रवासाचा अनुभव
Mrunmayi Deshpande : मृण्मयी देशपांडे पती स्वप्नील रावसोबत ऑस्ट्रेलिया ट्रीपवर गेली आहे.

Mrunmayi Deshpande : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayi Deshpande ) सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तेथील काही व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मृण्मयी देशपांडे पती स्वप्नील रावसोबत ऑस्ट्रेलिया ट्रीपवर गेली आहे.
या प्रवासासाठी त्यांनी कोणतीही लक्झरी हॉटेल न निवडता एका ‘चालतं-फिरतं घर’ म्हणजेच ‘मोटरहोम’ला पसंती दिली. या मोटरहोममध्ये स्वयंपाकघर, भांडी घासण्याची जागा आणि झोपण्यासाठी बेड अशा सर्व सोयी आहेत. Mrunmayi Deshpande
मृण्मयी व्हिडीओमध्ये म्हणते की, “सध्या मी ऑस्ट्रेलियात एका कॅम्पिंग ग्राउंडवर आहे. आम्ही इथे एक मोटरहोम भाड्याने घेतले आहे. गेल्या १५ दिवसांपासून आम्ही या गाडीतूनच फिरतोय आणि पुढचे १५ दिवसही आमचा मुक्काम याच गाडीत असणार आहे.
आम्ही रोज घरचेच अन्न बनवून खातोय. कधी नदीकाठी तर कधी घनदाट जंगलात गाडी थांबवून आम्ही स्वयंपाक करतो. समोर हवं ते ठिकाण आणि निसर्ग पाहता येतो, हे या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या प्रवासात मजा आहे, साहस आहे आणि स्वतःला नव्याने शोधण्याचा एक सुंदर अनुभव आहे.” Mrunmayi Deshpande
View this post on Instagram
मृण्मयी अनेकदा तिच्या महाबळेश्वरमधील शेतीचे व्हिडीओ शेअर केले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच्या तिच्या या निर्णयाचे अनेकदा कौतुक करण्यात आले. यानंतर आता तिच्या या अनोख्या ऑस्ट्रेलिया ट्रीपनेही अनेकांची मनं जिंकली आहे.
मृण्मयी ही ‘कट्यार काळजात घुसली’, ‘सुभेदार’, ‘फर्जंद’, ‘बोगदा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘शिकारी’, ‘चंद्रमुखी’, ‘फतेशिकस्त’ अशा अनेक चित्रपटांतील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. Mrunmayi Deshpande
हेही वाचा:
Poonam Dhillon story: रिअॅलिटीसाठी घेतली रिस्क; पूनम ढिल्लोंने सांगितला पहिल्या फिल्मचा अनुभव





