Pooja Sawant : जे समोर दिसतं ते वास्तव की भास? पूजा सावंत नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Pooja Sawant : या सस्पेन्स थ्रिलरचं दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केलं आहे.

Pooja Sawant : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘दृश्य-अदृश्य ‘ या तिच्या आगामी सिनेमाचे पोस्टर अलिकडेच प्रदर्शित झाले.
पोस्टरमध्ये पूजाच्या नजरेतला गोंधळ, भीती आणि शोध ‘दृश्य-अदृश्य’च्या कथानकाचा गाभा अधोरेखित करते. तिच्या मागे पोलिसी वेशात अशोक समर्थ पाहायला मिळत आहे.
या सिनेमाविषयी पूजा म्हणाली, ‘दृश्य-अदृश्य’ हा माझ्यासाठी केवळ एक सिनेमा नाही, तर माझ्या आतला प्रवास आहे. आपण जे पाहतो, त्यावर सहज विश्वास ठेवतो, पण या कथेनं मला शिकवलं, की प्रत्येक सत्याच्या मागे काहीतरी दडलेलं असतं, जे सहसा दिसत नाही.
प्रेक्षक हा चित्रपट पाहतील, तेव्हा ते स्वतःच्या अनुभवांशीही जोडले जातील. कदाचित त्या क्षणी ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ यांच्यातली रेषा त्यांच्यासाठीही धूसर होईल.’ Pooja Sawant
View this post on Instagram
आरएसटी कॅनव्हास निर्मित या सस्पेन्स थ्रिलरचं दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केलं आहे, तसेच कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. पूजासोबत सिनेमात अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी आणि केया इंगळे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. येत्या १९ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Pooja Sawant
हेही वाचा:





