भुईमूग पिकाला उन्नी किडीचा प्रादुर्भाव
Updated On:

लाखणगाव – उन्हाळी भुईमूग पिकाला उन्नी किडीच्या प्रार्दुभावामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. औषध फवारणी करूनही किडीचा बंदोबस्त होत नसल्याने भुईमूग उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा फटका शेती पिकांना बसत आहे.
उन्हाळी भुईमुगाच्या खुरपण्या पूर्ण झाल्या आहेत. खत टाकून पाणी भरण्याची कामे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. मात्र, भुईमुगाला उन्नीचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. उन्नी कीड भुईमूग झाडाचे मूळ खात असल्यामुळे भुईमुगाचे नुकसान झाले आहे. उन्नीचा बंदोबस्त कसा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.





