Tara Sutaria: कान्स २०२६मध्ये तारा सुतारियाचा ग्लॅमरस जलवा; ऑफ-व्हाईट गाऊनमध्ये जिंकली सगळ्यांची मनं

Tara Sutaria ताराने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती अतिशय रॉयल आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Updated On:
Photo 1

Tara Sutaria: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ७९व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६मध्ये भारतीय कलाकारांचा दबदबा कायम पाहायला मिळत आहे. यंदा अभिनेत्री तारा सुतारिया हिने कान्समध्ये पदार्पण करताच आपल्या स्टायलिश आणि एलिगंट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

ताराने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती अतिशय रॉयल आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ‘वुमन इन सिनेमा’ गाला कार्यक्रमात तारा सुतारियाला सन्मानित करण्यात आले. हा क्षण तिच्यासाठी खूप खास असल्याचं तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. हा अनुभव कायम आपल्या मनात राहील, असंही तिने नमूद केलं. तिच्या या यशामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

गाला नाईटसाठी ताराने ऑफ-व्हाईट रंगाचा बॉडी फिटेड गाऊन निवडला होता. या गाऊनचा फ्लोई डिझाईन आणि लांब ड्रेप स्लीव्ह्समुळे तिचा संपूर्ण लूक अतिशय क्लासी आणि रॉयल दिसत होता. विशेष म्हणजे गाऊनचा ऑफ-शोल्डर पॅटर्न तिला रेड कार्पेटवर अधिक ग्लॅमरस लूक देत होता. साधेपणा आणि स्टाईल यांचा सुंदर मिलाफ तिच्या या फॅशनमध्ये पाहायला मिळाला.

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

ताराने हा आउटफिट अतिशय आत्मविश्वासाने कॅरी केला. कॅमेऱ्यासमोर तिचा पोझ देण्याचा अंदाज आणि तिचा आत्मविश्वास अनेकांचं लक्ष वेधून घेत होता. सोशल मीडियावर तिच्या या लूकला “एलिगंट”, “गॉर्जियस” आणि “रेड कार्पेट परफेक्ट” अशा प्रतिक्रिया मिळत आहेत.

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

तिच्या ज्वेलरीनेही चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं. ताराने डायमंड आणि एमराल्ड ज्वेलरी परिधान केली होती. हिरव्या रंगाच्या स्टोनचा नेकलेस आणि मॅचिंग कानातले ऑफ-व्हाईट गाऊनसोबत अतिशय आकर्षक दिसत होते. त्यामुळे तिच्या संपूर्ण लूकमध्ये एक रॉयल टच दिसून आला.

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

हेअरस्टाईलमध्ये ताराने स्लीक बन लूक केला होता. त्यामुळे तिचा फेसकट अधिक उठून दिसत होता. मेकअपबाबत बोलायचं झाल्यास तिने सॉफ्ट आणि ग्लोइंग मेकअप निवडला होता. न्यूड लिपस्टिक, शार्प आय मेकअप आणि हलक्या ब्लशमुळे तिचं नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

Tara Sutaria Cannes Film Festival 2026

तारा सुतारियाचा हा कान्स लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्या फॅशन सेन्सचं भरभरून कौतुक केलं जात आहे. साधेपणा, ग्लॅमर आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम असलेल्या या लूकमुळे तारा कान्स २०२६मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक ठरली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Aishwarya Rai: आयव्हरी रोज ड्रेसमध्ये ऐश्वर्या रायचा एलिगंट अंदाज; विंटेज हॉलीवूड स्टाइलची चाहत्यांना आठवण

Aishwarya Rai: आयव्हरी रोज ड्रेसमध्ये ऐश्वर्या रायचा एलिगंट अंदाज; विंटेज हॉलीवूड स्टाइलची चाहत्यांना आठवण

Aishwarya Rai Bachchan: कान्समध्ये पुन्हा ऐश्वर्याची जादू! आराध्याच्या हटके लुकनेही वेधलं सगळ्यांचं लक्ष

Aishwarya Rai Bachchan: कान्समध्ये पुन्हा ऐश्वर्याची जादू! आराध्याच्या हटके लुकनेही वेधलं सगळ्यांचं लक्ष

Diana Penty: कान्समध्ये डायना पेंटीचा पारंपरिक जलवा; मनीष मल्होत्राच्या गोल्डन साडीत दिसली अप्सरेसारखी!

Diana Penty: कान्समध्ये डायना पेंटीचा पारंपरिक जलवा; मनीष मल्होत्राच्या गोल्डन साडीत दिसली अप्सरेसारखी!

Huma Qureshi: कान्समध्ये हुमा कुरेशीची भन्नाट एन्ट्री; साऊथ सुपरस्टार यशसोबतच्या खास फोटोंनी वेधलं लक्ष!

Huma Qureshi: कान्समध्ये हुमा कुरेशीची भन्नाट एन्ट्री; साऊथ सुपरस्टार यशसोबतच्या खास फोटोंनी वेधलं लक्ष!