Pune Peoples Co-op Bank: पुणे पीपल्स को-ऑप बँकेला ‘सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा उपक्रम’ राष्ट्रीय पुरस्कार
Pune Peoples Co-op Bank:

Pune Peoples Co-op Bank: पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे यांनी आणखी एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. क्रेस्ट इन्फो मीडिया यांच्या वतीने आयोजित 10 वा ऑल इंडिया अर्बन को-ऑप बँकिंग समिट अँड अवॉर्ड्स 2026 हा कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
या समारंभात बँकेस बेस्ट कस्टमर सर्व्हिस इनेशेटीव्ह हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार बँकेचे वतीने अध्यक्ष श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, बँकेचे जेष्ठ संचालक जनार्दन रणदिवे, सुभाष नडे, विश्वनाथ जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके, बँकेचे आयटी विभाग प्रमुख कैलास पवार यांनी स्वीकारला.
बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड म्हणाले की, अत्याधुनिक बँकिंग सुविधा अधिक व्यापक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वाच्या एकत्रित प्रयत्नातून बँक प्रगती साध्य करत आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी सांगितले. सहकारी बैंकिंग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणारे पुरस्कार हे बँकेच्या सक्षम नेतृत्वाचे प्रतीक मानले जात आहे व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी सांगितले.





