Wagholi Accident: वाघोली येथे खड्ड्यात डंपर पलटी
Wagholi Accident:
Updated On:

Wagholi Accident: वाघोली येथील बाईफ रोड परिसरात फकीरबाबा वाडा येथे ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना खोदलेल्या खड्ड्यात डंपर पलटी झाल्याची घटना बुधवारी (दि. २२) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
काम सुरू असताना खड्ड्यात पोकलेंड देखील होते. डंपरचा पुढील भाग पोकलेंड वर आदळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. क्रेनच्या सहाय्याने डंपर काढण्यात आला आहे. ड्रेनेज लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.





