Shirur News : जांबुतच्या शेतकऱ्यांचा सुटकेचा निश्वास; 9 वर्षांचा धिप्पाड नर बिबट्या जेरबंद!
शिरूर तालुक्यातील (Shirur News) जांबुत आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत असून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले आणि मानवी वस्तीत बिबट्याचा वाढलेला वावर यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Shirur News : शिरूर तालुक्यातील (Shirur News) जांबुत आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत असून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले आणि मानवी वस्तीत बिबट्याचा वाढलेला वावर यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
यामुळे ग्रामस्थांच्या (Shirur News) मागणीनुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी पहाटे नऊ वर्षांचा एक धिप्पाड नर बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जांबुत येथील शिवाजी लक्ष्मण थोरात यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. शनिवारी (दि. २५) पहाटेच्या सुमारास हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना पिंजऱ्यात अडकला.
वनविभागाने तत्परता दाखवत घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी महेंद्र दाते व बेस कॅम्पच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील देखरेखीसाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
पकडण्यात आलेला (Shirur News) बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला नर असून त्याचे वय अंदाजे ९ वर्ष आहे. या परिसरात त्याची मोठी दहशत होती, अशी माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली. गेल्या काही काळापासून हा बिबट्या पाळीव प्राण्यांची शिकार करत होता. अनेकदा तो लोकवस्तीजवळ दिसून आल्याने शेतकऱ्यांना शेतात काम करणे कठीण झाले होते.
आता हा नर बिबट्या जेरबंद झाल्यामुळे जांबुत परिसरातील नागरिकांची भिंती काही प्रमाणात कमी झाली असून, वनविभागाच्या या यशस्वी कारवाईचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड बीट हे बिबट्यांचे हॉट स्पॉट म्हणून ओळखले जाते.९ वर्षाच्या जेरबंद बिबट्यासह या बीट अंतर्गत आतापर्यंत तब्बल ४५ बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या आकड्यावरून या परिसरात बिबट्यांची संख्या आणि मानवी संघर्ष किती तीव्र आहे, याची प्रचिती सातत्याने येत आहे.






