पिंपरी | आरोग्य तपासणी शिबिरामध्ये १४० नागरिकांना लाभ

पिंपरी, (प्रतिनिधी) – मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी पुणे यांच्या वतीने भोसरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तरी सोमवार, (दि. २७) आणि बुधवार (दि. २९) या दोन दिवसांमध्ये १४० नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घेतल्याचे मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी यांच्या कडून सांगण्यात आले.
यामध्ये साफसफाई कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षक कार्यालयीन कर्मचारी यांच्या तपासणी सोमवारी (दि. २७) करण्यात आली. यावेळी सुमारे ८० नागरिकांची आरोग्य तपासणी झाली. तसेच मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी पुणे यांच्या मार्फत ज्येष्ठ नागरिक संघ, विरंगुळा केंद्र इंद्रायणी नगर भोसरी येथे बुधवारी (दि. २९) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते.
यावेळीस सुमारे ६० नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली. यामध्ये ईसीजी, बीपी, रक्तातील साखर, वजन आणि वरिष्ठ डॉक्टरचा सल्ला देण्यात आला. तसेच या शिबिरात डॉ. राधिका, आणि मेडिकव्हर हॉस्पिटल टीमने या शिबिरात महत्वपूर्ण भूमिका बजावली.





