डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणी एक डॉक्टर अटकेत
Updated On:

मुंबई- डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी रॅगिंग करणाऱ्या एका महिला डॉक्टरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. भक्ती मेहरे असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. अन्य दोन फरार डॉक्टर्सचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी नायर हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासोबतच रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.
तसेच याप्रकरणी चार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नायर हॉस्पिलमधील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आले आहे.
टॅग्स:





