जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट; २० जण जखमी तर ३ गंभीर

जालना – जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत २० जण जखमी झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. हा स्फोट लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडून २० जण जखमी झाले आहे. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड कामगारांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह, बचाव पथकाने घटनास्थळी पोहचत बचाव कार्याला सुरुवात केली. घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेत २० कामगार जखमी झाले असून यांपैकी ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळासह, रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून जबाब नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.





