Virat Kohli : “स्वतःला सिद्ध करायची वेळ आली तर…” विराट कोहलीच्या ‘त्या’ विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ!
भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट भविष्याबाबत मोठे संकेत दिले आहेत. २०२७ च्या एकदिवसीय विश्वकापापूर्वीच निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याचे त्याच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.

Virat Kohli : भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट भविष्याबाबत मोठे संकेत दिले आहेत. २०२७ च्या एकदिवसीय विश्वकापापूर्वीच निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याचे त्याच्या विधानातून स्पष्ट झाले आहे. या विधानाने कोहलीच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला, “मला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड आहे. पण जर मला स्वतःची योग्यता सिद्ध करण्याची वेळ आली, तर ती माझ्यासाठी योग्य जागा नाही.” त्याने स्पष्ट केले की, तो कोणतीही मालिका किंवा सामना खेळण्यासाठी सदैव तयार असेल, मात्र त्याला आपली जागा सिद्ध करावी लागणार नाही, अशी त्याची इच्छा आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) २०२४ च्या टी-२० विश्वकाप जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. आता एकदिवसीय क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती घेण्याचे संकेत त्याने दिले आहेत.
कोहली सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. गेल्या काही वर्षांत त्याचा फॉर्म अनेकदा चर्चेचा विषय ठरला होता. तरीही २०२४ च्या टी-२० विश्वकाप विजयात त्याची भूमिका महत्त्वाची होती.
चाहत्यांसाठी धक्कादायक
विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या या विधानाने चाहते निराश झाले असून, सोशल मीडियावर याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
कुटुंबाला प्राधान्य
गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन्ही मुलांसोबत लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. तो भारतात फक्त क्रिकेट किंवा महत्त्वाच्या कामासाठी येतो. सोशल मीडियावर त्याचे लंडनमधील कौटुंबिक व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. विराट आता जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला देत असल्याचे दिसते. त्याने आपल्या दोन्ही मुलांना प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर ठेवले आहे.






