Nita Ambani : “धीरूभाई अंबानी स्कूलच्या ‘हेड बॉय’ने नीता अंबानींसमोरच मारला मुंबई इंडियन्सवर टोमणा; पुढे जे घडलं…”
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या २०२६ च्या बॅचचा पदवीदान समारंभ सध्या सोशल मीडियावर (Nita Ambani) एका रंजक कारणामुळे प्रचंड व्हायरल होत आहे.

Nita Ambani : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या २०२६ च्या बॅचचा पदवीदान समारंभ सध्या सोशल मीडियावर (Nita Ambani) एका रंजक कारणामुळे प्रचंड व्हायरल होत आहे.
भावनिक आठवणी, प्रेरणादायी संदेश आणि भविष्यातील स्वप्नांनी भरलेल्या या कार्यक्रमात शाळेच्या हेड बॉयने आपल्या भाषणादरम्यान थेट क्रिकेटचा संदर्भ आणला.
त्याने अंबानी (Nita Ambani) कुटुंबाचा आयपीएल संघ असलेल्या मुंबई इंडियन्सवर (MI) अशी काही मार्मिक टिप्पणी केली की, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला. विशेष म्हणजे, समोर बसलेल्या मुंबई इंडियन्सच्या मालकीण आणि शाळेच्या संस्थापिका नीता अंबानी (Nita Ambani) यांनाही या विधानावर आपले हसू आवरता आले नाही.
आपल्या शालेय प्रवासाविषयी, मैत्रीविषयी आणि भविष्यातील आव्हानांविषयी बोलताना त्या विद्यार्थ्याने यंदाच्या आयपीएल हंगामातील मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीचा संदर्भ घेतला. यंदाच्या आयपीएलमध्ये १० संघांमध्ये सर्वप्रथम मुंबईचा संघच स्पर्धेतून बाद झाला होता.

Nita Ambani : “धीरूभाई अंबानी स्कूलच्या ‘हेड बॉय’ने नीता अंबानींसमोरच मारला मुंबई इंडियन्सवर टोमणा; पुढे जे घडलं…”
याच कठीण परिस्थितीचा उल्लेख करत तो विद्यार्थी म्हणाला, “आपल्या लाडक्या मुंबई इंडियन्सप्रमाणेच, आयुष्यातही काही कठीण काळ येतील.” त्याच्या या गुगलीवर सभागृहात साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले. कॅमेरा लगेचच नीता अंबानी (Nita Ambani) यांच्याकडे वळला, ज्या स्वतःही या विनोदाचा आनंद घेत हसताना आणि मजेशीर पद्धतीने आपला चेहरा झाकताना कॅमेऱ्यात कैद झाल्या.
दरम्यान, हा केवळ एक वरवरचा विनोद नव्हता, तर त्या विद्यार्थ्याने लगेचच आपल्या वक्तव्याला एका मोठ्या जीवन-बोधाशी जोडले. संघर्ष, वारसा आणि आत्मविश्वासाचा संदेश देत तो पुढे म्हणाला की, आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा कठोर परिश्रमाचे फळ मिळणार नाही आणि प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पण मुंबई इंडियन्सप्रमाणेच, आपण आपली ओळख, वारसा आणि लोकांवरील विश्वास कधीही सोडता कामा नये. (Nita Ambani)
अखेरीस, त्याने मुंबई इंडियन्सच्या प्रसिद्ध घोषणाबाजीचा वापर करत “दुनिया हिला देंगे!” असे म्हणत आपल्या भाषणाचा समारोप केला आणि तिथे उपस्थित असलेल्या नीता अंबानी (Nita Ambani) यांच्यासह संपूर्ण सभागृहाची मने जिंकून घेतली.





