Israel Attack : इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमधील 19 जण ठार
इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात (Israel Attack) आज किमान १९ जण ठार झाले. त्यामध्ये चार महिलांचा आणि ३ लहान मुलांचाही समावेश आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

Israel Attack : इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात (Israel Attack) आज किमान 19 जण ठार झाले. त्यामध्ये चार महिलांचा आणि ३ लहान मुलांचाही समावेश आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
इस्रायलकडून (Israel Attack) सध्या जवळपास दररोजच लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात हवाई हल्ले केले जात असून अमेरिकेच्या मध्यस्थीने लेबनॉन सरकारबरोबर युद्धविराम करार झाला असतानाही इस्रायलने असे हल्ले करणे थांबवलेले नाही, असेही लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
हवाई हल्ल्यात (Israel Attack) झालेल्या जीवितहानीबद्दल इस्रायलने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ल्यांना सुरुवात केल्याच्या दोन दिवसांनी २ मार्च रोजी लेबनॉनमधील हिज्बुल्लाह गटाने इस्रायलमध्ये रॉकेट डागायला सुरुवात केली होती. तेंव्हापासून इस्रायल-हिज्बुल्लाहमधील संघर्ष सुरू आहे.
टायर नदीच्या किनाऱ्याजवळील देर कनून अल नहर गावावर झालेल्या हवाई हल्ल्यामध्ये १० जण ठार झाले. या हल्ल्यात ३ महिला आणि ३ मुलेही मारली गेली. तर अन्य तिघे जखमी झाले. तसेच एक घर उद्ध्वस्त झाले आणि ढिगाऱ्याखाली काही लोक गाडले गेले. नंतर या सर्वांचे मृतदेह बाहेर काढले गेले, असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
दक्षिणेकडील नाबतिह या शहरावर झालेल्या दुसऱ्या हवाई हल्ल्यात चार ठार झाले आणि २ महिलांसह १० जण जखमी झाले. तर तिसरा हल्ला कफोर सिर गावाजवळ झाला. त्यात ५ जण ठार झाले, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायल आणि हिज्बुल्लाहमधील संघर्षात मरण पावणाऱ्यांची संख्या आता ३ हजारांच्या पुढे गेली आहे. तर लेबनॉनमध्ये दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धविरामाला अलिकडेच ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.






