Indian Bank RAM Loan Camp: इंडियन बँकेतर्फे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यासाठी ‘मेगा रॅम’ कर्ज शिबीर
Indian Bank RAM Loan Camp: शिबिराचे आयोजन इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बिनोद कुमार यांच्या उपस्थितीत झाले. शिबिरामध्ये, विभिन्न रॅम क्षेत्रांतर्गत ग्राहकांना एकूण रु.1,048 कोटी रुपयांची ऋण मंजूरीपत्रे वितरित केली गेली. यामध्ये रु.634 कोटीचा मुख्य वाटा एमएसएमई क्षेत्राचा होता.

Indian Bank RAM Loan Camp: सार्वजनिक क्षेत्रातील बँक इंडियन बँकेने क्षेत्र महाव्यवस्थापक कार्यालय मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी, ज्याचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांमध्ये पसरलेला आहे, एका मेगा रॅम कर्ज वितरण व लोकसंपर्क शिबिराचे सफलतापूर्वक आयोजन केले आहे.
शिबिराचे आयोजन इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक बिनोद कुमार यांच्या उपस्थितीत झाले. शिबिरामध्ये, विभिन्न रॅम क्षेत्रांतर्गत ग्राहकांना एकूण रु.1,048 कोटी रुपयांची ऋण मंजूरीपत्रे वितरित केली गेली. यामध्ये रु.634 कोटीचा मुख्य वाटा एमएसएमई क्षेत्राचा होता.
बिनोद कुमार यांनी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी बँकेच्या दृढ़ वचनबद्धतेवर जोर देत रॅमच्या क्षेत्रात बँकेच्या वेगवेगळ्या परिवर्तनात्मक उपक्रमांबद्दल ही विस्ताराने सांगितले. त्यांनी रिटेल, कृषि आणि एमएसएमई क्षेत्रांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात ऋण सहायता उपलब्ध करण्याचे महत्त्व प्रतिपादित केले, जी क्षेत्रे संपूर्ण देशात रोजगार निर्मिती तसेच आर्थिक विकासात महत्वाची भूमिका निभावतात.





