Manu Bhaker : मनू भाकरला वैभव सूर्यवंशीबद्दल विचारला ‘तो’ प्रश्न; सोशल मीडियावर चाहत्यांकडून संताप

दोन वेळा ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या स्टार नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) नुकताच भारतीय राष्ट्रीय नेमबाजी संघटने च्या ७५व्या वर्धापनदिन सोहळ्यात हजेरी लावली.

Updated On:
Manu Bhaker : मनू भाकरला वैभव सूर्यवंशीबद्दल विचारला ‘तो’ प्रश्न; सोशल मीडियावर चाहत्यांकडून संताप

Manu Bhaker : दोन वेळा ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या स्टार नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) नुकताच भारतीय राष्ट्रीय नेमबाजी संघटने च्या ७५व्या वर्धापनदिन सोहळ्यात हजेरी लावली.

या कार्यक्रमादरम्यान (Manu Bhaker) शूटिंग लीग ऑफ इंडिया आणि लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकशी संबंधित खेळाडू ॲपच्या अनावरणासारख्या विषयांवर चर्चा झाली.

कार्यक्रमात पत्रकारांनी मनू भाकरला (Manu Bhaker) सध्या चर्चेत असलेल्या युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीबद्दल त्यांचे मत विचारले. यावर मनू भाकरने उत्तर देताना म्हटले, “जर वैभव सूर्यवंशीला योग्य मार्गदर्शन, सभोवतालचे सकारात्मक वातावरण आणि चांगल्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले, तर वय हा केवळ एक आकडा आहे. मला विश्वास आहे की तो भारतीय क्रिकेटचा पुढचा मोठा स्टार बनू शकतो.”

मनू भाकर यांच्या कामगिरीवरून चर्चा होत असताना त्यांना क्रिकेटपटूबद्दल प्रश्न विचारण्यावर सोशल मीडियावर जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अनेकांनी याला मनू भाकर यांच्या उपलब्धीचा अपमान आणि इतर खेळांतील खेळाडूंच्या उपेक्षेचे प्रतीक मानले. भारतात क्रिकेटच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे इतर खेळांतील यशस्वी खेळाडूंना अनेकदा दुय्यम स्थान दिले जाते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

Manu Bhaker

Manu Bhaker

कोलकाता नाइट रायडर्सचे (KKR) माजी संघ संचालक जॉय भट्टाचार्य यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. एक्स (ट्विटर) वर त्यांनी लिहिले, “मित्रांनो, ती एक ऑलिम्पिक पदक विजेती आहे. वैभव सूर्यवंशीबद्दल तिला काय वाटते असे विचारणे म्हणजे तिच्या कामगिरीचा आणि तिच्या खेळाचा अपमान आहे. क्रिकेट हा आधीच या देशाचा सर्वात मोठा छंद आहे; तुमच्या क्रीडा संपादकांना सूर्यवंशीबद्दल मथळे तयार करण्यासाठी इतर कोणत्याही सेलिब्रिटीच्या वक्तव्याची गरज नाही. किंवा पुढच्या वेळी वैभव सूर्यवंशीला मनू भाकरबद्दल विचारा आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव पहा.”

आणखी संबंधित बातम्या

अग्रलेेख : खेळाचे राजकारण

2026-08-31 06:00:12

अग्रलेेख : खेळाचे राजकारण

Panjab News : पंजाबमध्ये खळबळ ! आपच्या 'या' नेत्याची गोळ्या झाडून हत्या

2026-08-30 16:42:30

Panjab News : पंजाबमध्ये खळबळ ! आपच्या 'या' नेत्याची गोळ्या झाडून हत्या

National Sports Day : खेलेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया

2026-08-29 15:23:18

National Sports Day : खेलेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया

National Sports Day : सामना जिंकल्याआधी स्वत:ला जिंका....; पदकासोबतच आरोग्यही महत्त्वाचे

2026-08-29 15:14:47

National Sports Day : सामना जिंकल्याआधी स्वत:ला जिंका....; पदकासोबतच आरोग्यही महत्त्वाचे

National Sports Day : महिला क्रिकेट-संघर्षातून यशाकडे

2026-08-29 14:47:15

National Sports Day : महिला क्रिकेट-संघर्षातून यशाकडे