Indian sport shooter manu bhaker | भारताची स्टार नेमबाज मनू भाकरच्या आजीचा आणि मामाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. महेंद्रगड बायपास रोडवर स्कूटर आणि ब्रेझा कारची टक्कर झाली. त्यामध्ये दोघेही जण जागीच मृत्युमुखी पडले. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही स्कूटीवरुन जात असताना अचानक एका गाडीने त्यांना धडक दिली. यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मनू भाकर यांचे मोठे मामा युद्धवीर सिंग आणि आजी सावित्री देवी अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. शहर पोलिस ठाण्याच्या प्रभारींसह पोलिस पथके घटनास्थळाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. दोनच दिवसांपूर्वी मनू भाकरला राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कसा झाला अपघात?
मनू भाकरचे मामा युद्धवीर सिंग हे रोडवेजमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यांचे महेंद्रगड बायपासवर घर आहे. ते आज नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले. त्याच वेळी मनूची आजी सावित्री देवी यांना त्यांच्या लहान मुलाच्या घरी लोहारु चौकात जायचे होते. त्यामुळे युद्धवीर आणि त्यांची आई एकत्र निघाले. मनू भाकरचे मामा हे दुचाकी चालवत कालियाना वळणाजवळ आले. Indian sport shooter manu bhaker |
त्याचवेळी समोरुन भरधाव वेगात उलट दिशेने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानतंर ती कार थेट मनू भाकर यांच्या दुचाकीला जाऊन आदळली. यावेळी युद्धवीर सिंग आणि सावित्री देवी हे रस्त्यावर पडून जखमी झाले. ही धडक इतकी भीषण होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. Indian sport shooter manu bhaker |
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला होता. ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. विशेष म्हणजे मनू भाकरची आजी सावित्री देवी (७०) ह्या देखील एक खेळाडू होत्या. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरही पदके जिंकली होती.
हेही वाचा: