प्रभात वृत्तसेवा वाई – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून वाई तालुक्यात विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. जनतेने ना. पाटील यांना साथ द्यावी, असे आवाहन वाई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहनराव जाधव यांनी केले.गुंडेवाडी, ता. वाई गावासाठी नवीन स्मशानभूमी शेड इमारत मंजूर झाले असून त्या कामाचे भूमिपूजन जाधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव शिंदे, खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन प्रल्हाद गाढवे, गुंडेवाडी पिराचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत मांढरे, माजी सरपंच दत्तात्रय पवार, धावडी सोसायटीचे व्हाइस चेअरमन प्रकाश पवार, सोसायटीचे संचालक कृष्णा पेटकर आदी उपस्थित होते.माजी सरपंच शशिकांत मांढरे म्हणाले, गुंडेवाडी गावासाठी स्मशानभूमीला जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईंकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. स्मशानभूमीला जागा उपलब्ध होत नव्हती. ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन पोपट, विलास व उमेश अंबिके या बंधूंनी त्यांच्याकडील जागा उपलब्ध करून दिली. ना. मकरंद पाटील यांनी तात्काळ स्मशानभूमी शेड इमारत व सुशोभिकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल गावकर्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. किसनराव अंबिके, शिवाजी पवार, निवृत्ती कदम, माजी सैनिक अंकुश पवार, नथू पेटकर, परशुराम पवार, विजय मांढरे, विनायक पवार, बापूराव अंबिके, सुरेश पेटकर, शामराव कदम, अमोल भादिर्गे, अशोक रेणुसे, अनिल मांढरे, विठ्ठ्ल पेटकर, गुलाबराव पवार, महेश पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.