प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या आज दि. २१ रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील विविध मतमोजणी केंद्रांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक, टेबलांची संख्या व फेऱ्यांचे नियोजन निश्चित करण्यात आले असून मतमोजणी कामासाठी एकूण 701 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी सुरु झाल्यानंतर दुपारपर्यंत प्रत्येक ठिकाणचे निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत. सातारा- डीएमओ गोदाम (नवीन एमआयडीसी, कोडोली)- 16 टेबल, 10 फेऱ्या व टपाली मतांसाठी 3 टेबल, एकूण कर्मचारी 196. कराड- कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र (शनिवार पेठ)-15 टेबल व प्रभागनिहाय 4 ते 8 फेऱ्या, एकूण कर्मचारी 65. फलटण- शासकीय धान्य गोदाम- 13 टेबल, 5 फेऱ्या, कर्मचारी 48. वाई- तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत- 11 टेबल, 1 ते 10 टेबल 3 फेऱ्या, टेबल क्रमांक 11- 4 फेऱ्या, कर्मचारी 68. महाबळेश्वर- गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय- 10 टेबल, 2 फेऱ्या, कर्मचारी 32. पाचगणी- सेंट पीटर्स स्कूल- 8 टेबल, 2 फेऱ्या, कर्मचारी 56. म्हसवड- मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सभागृह- 6 टेबल, 5 फेऱ्या, कर्मचारी 50. रहिमतपूर- क्रीडा संकुल- 10 टेबल, 2 फेऱ्या, कर्मचारी संख्या 77. मलकापूर- यशवंतराव चव्हाण सभागृह- १२ टेबल, 3 फेऱ्या, कर्मचारी 90. मेढा (जावळी)- तहसील कार्यालय- 5 टेबल, 4 फेऱ्या, कर्मचारी 19.मतमोजणीचे सर्व प्रक्रियात्मक आणि सुरक्षेसंबंधी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततामय आणि सुव्यवस्थित व्हावी यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.