प्रभात वृत्तसेवा सातारा – देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पद्मभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवनात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुवर्णादेवी पाटील, प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलावडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शफिक शेख, अतुल शिंदे, महिला अध्यक्षा संजना जगदाळे, समिंद्रा जाधव, अर्चना देशमुख, राजश्री पाटील, मेघाताई नलवडे, नलिनी जाधव, भारतीताई काळंगे, अंजली राजपूत, वैशाली जाधव, अॅड. रणजितसिंह जगदाळे, प्रताप जगदाळे, बाळासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. सुवर्णादेवी पाटील म्हणाल्या, भारतीय राजकारणातील भीष्माचार्य, शेतकर्यांसाठी सगळ्यात जास्त योजना राबवणारे, शेतकर्यांचे खरे नेते, ज्या नेत्याने उभ्या महाराष्ट्रात अनेक नेतृत्व जन्माला घातली, नेत्यांचे जणू पिकच या भारतभूमीत उभे केले, गावोगावी छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत ओळख ठेवणारे लोकनेते, सह्याद्रीसम उत्तुंग राजनीतिज्ञ, विरोधकही ज्याना गुरुस्थानी मानतात असे धुरंधर, संयमी नेतृत्व म्हणून देशात पवारांचे नाव घेतले जाते. त्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करताना एक ऊर्जा मिळते.यावेळी सचिन बागल, मयूर देशमुख, अमोल खुडे, दयानंद नागटिळक, यांच्यासह प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.