प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्यात 12 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सातारा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे 2 लाख 80 हजार 351 मतदार आहेत. मतदार यादीत असलेल्या दुबार मतदारांचे हमीपत्र घेणार असल्याची माहिती सातारा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आशिष बारकुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अधिकारी बारकुल म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती सातारा जिल्हा परिषद निवडणूक 2026 साठी पंचायत समिती निर्वाचित गट 16 आहेत. जिल्हा परिषदेचे आठ गट आहेत. पुरुष 1 लाख 41 हजार 489, महिला 1 लाख 38हजार 856 आणि इतर सहा असे एकून दोन लाख 80 हजार 351 एवढे आहे. नामनिर्देशन पत्र 16 ते 21 जानेवारी दरम्यान करायचा आहे. रविवार दिवस सुट्टीचा वळगता 11 ते 3 अशा वेळेत दाखल करता येणार आहे.छाननी 22 तारखेपासून होणार आहे. जे पात्र होतील त्याचे नावाची यादी लावण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख 23, 24 आणि 27 अशी असणार आहे. मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी असणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असणार आहे. 371 मतदान केंद्रे आहेत. मतमोजणी ही 7 फेबु्रवारीला होणार आहे. मतमोजणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोडावून एमआयडीसीतील कोडोली येथील गोदाम नंबर 1 ब मध्ये होणार आहे.