प्रभात वृत्तसेवा सातारा – शहरासह तालुक्यातील चक्री जुगारावर शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईतून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा 6 लाख 86 हजार 574 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालय परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून गुरुप्रसाद शेखर साठे (रा. शुक्रवार पेठ), जयकिशन सुखरामजी बिष्णोई, रोहित रघुनाथ पंधारे, वैभव सोपान महाराज (तिघे रा. सदरबझार), गणेश सिताराम भिसे (रा. कोरेगाव), ऋषिकेश दत्ता वायदंडे (रा. करंजेपेठ), अनिल दशरथ खंडाळे (रा. शनिवार पेठ), संतोष शामराव माने (रा. कोरेगाव), शांतमल्लप्पा मरजप्पा तोटनाक, नसरेआलम मुख्तार सहा (दोघे रा. सदरबझार) यांच्याकडून मोबाइल व जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा 1 लाख 2 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गोडोली येथून सुशांत संदीप ढवळे (वय 28, रा. शनिवार पेठ) याला ताब्यात घेत 950 रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. गुरुवार परज येथून शहर पोलिसानी एलईडी स्क्रिन, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल असा 43 हजार 160 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गोडोली येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून संतोष विठ्ठल जाधव (रा. गोडोली), मालक शशिकांत तळप (रा. क्षेत्रमाहुली), नवनाथ पाटील (रा. खिंडवाडी), अजय अभय काळे (रा. संभाजीनगर), किशोर प्रल्हाद अडागळे (रा. गोडोली), लालचंद प्रसाद पाटील (रा. कोडोली), अविनाश श्रीरंग तोरस्कर (रा. जाधववाडी), संतोष इरय्या स्वामी (रा. शाहूनगर) यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल, रोख रक्कम, सीसीटीव्ही कॅमेरे, जुगाराचे साहित्य असा 1 लाख 58 हजार 250 असा मुद्देमाल हस्तगत केला. शाहूपुरी पोलिसांनी मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकुन प्रकाश तात्याबा इंगळे (रा. धावडशी, ता. सातारा), सूरज आकाराम यादव (रा. व्यंकटपुरा पेठ), नितीन अनिल कुर्हाडे (रा. करंजे पेठ) यांना ताब्यात घेउन 9 हजार 14 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. तालुका पोलिसांनी शेंद्रेच्या हददीतील बस स्टॉपपाठीमागील जुगार अड्ड्यावर छापा टाकून संतोष सर्जेराव कटावटे (रा. बोरगाव ता. सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 हजार 270 रुपये रक्कम हस्तगत केली. याच गावात दोन जुगार अड्डयावर कारवाई करत प्रमोद आनंदराव पोतेकर (रा. शेंद्रे) यांच्याकडून 1 हजार 400 रुपये, संतोष कृष्णा जाधव (रा. शेंद्रे) यांच्याकडून 1170 रुपये जप्त केले. करंजे चौक येथील जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून विघ्नेश सुरेश पवार (रा. सैदापूर), सागर रमेश इंदलकर, आकाश सुधीर इंगवले, ईश्वर प्रदीप तावस्कर (तिघे रा. करंजे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 68 हजार 150 रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. गुरुवार परज येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी पवीत सतीश चोरगे (रा. रविवार पेठ) याला ताब्यात घेत 1 लाख 52 हजार रुपये रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त केले.