प्रभात वृत्तसेवा किडगाव – युवक सहकारी पतसंस्था खर्या अर्थाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची अर्थ वाहिनी असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे, अशी स्पष्टोक्ती बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.धावडशी, ता. सातारा येथील युवक सहकारी पतसंसंस्थेच्या सन 2026 च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ना. भोसले यांनी पतसंस्थेच्या आधुनिक आणि पारदर्शक कारभाराचे कौतुक केले. संस्थेने ग्राहकांच्या सोयीसाठी ऑनलाइन व्यवहारांसाठी क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून दिली असून, संपूर्ण कामकाज संगणक प्रणालीद्वारे सुरू आहे. लवकरच कोर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन प्रभाकर पवार यांनी संस्थेची कळंबे, ता. सातारा येथे नवीन शाखा सुरू करण्यास सहकार खात्याची मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 7 कोटी 50 लाख, कर्ज वाटप 5 कोटी 20 लाख, गुंतवणूक 3 कोटी रुपये असून 7 लाख 50 हजार रुपयांचा नफा आहे. खेळते भांडवल 9 कोटी, तर वार्षिक उलाढाल 21 कोटी रुपये आहे. संचालक अशोक कापसे यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराची ग्वाही दिली.