प्रभात वृत्तसेवा वडूज – गेल्या पाच वर्षापासून परागंदा असलेल्या आरोपीस वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.रणजित लाला चव्हाण वय 32, रा. पळशी, ता. खटाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कातरखटाव, ता. खटाव हद्दीत यातील आरोपींनी त्याची मोटार सायकल तक्रारदार मनोज रवी गादापुरगठ रा. कातरखटाव यांच्या मोटार सायकलीस आडवी मारुन चाकुची भिती दाखवून तक्रारदारांकडील रोख दहा हजार रुपये जबदरस्तीने चोरी करुन नेल्याची घटना घडली होती.याबाबत तक्रारदार मनोज रवी यांनी वडुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित रणजित लाला चव्हण हा गुन्हाघडल्यापासुन परागंदा होता. त्याचा घरी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो सापडत नव्हता. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी त्याची गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन तो दि. 25 डिसेंबर रोजी राहत्या घरी आल्याची माहिती प्राप्त केली.त्या आधारे पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांच्या टीम ने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.या कारवाईत पोनि घनश्याम सोनवणे, पो.हवा. संदीप झगडे, पो. कॉ. कुंडलिक कटरे, पो.कॉ. सागर बदडे, वाहतूक कर्मचारी अजय भोसले, सत्यवान खाडे, पो.कॉ. विजय खाडे यांनी सहभाग घेतला.