महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी जेष्ठ नगरसेवक नासिर मुलाणी यांची आज बिनविरोध निवड झाली तसेच स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष किसन शिंदे व कुमार शिंदे यांच्या गिरिस्थान नगर विकास आघाडीच्यावतीने सीए मिलिंद ढेबे यांनी नियुक्ती झाली असल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केली यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. महाबळेश्वर पालिकेच्या उपनगराध्यक्ष व दोन नामनिर्देशन सदस्यांचा निवडीसाठी नूतन नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी गुरुवारी सकाळी पालिका कार्यालयात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जेष्ठ नगरसेवक नासिर मुलाणी यांचा एकमेव अर्ज आला असल्यामुळे त्यांची पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी जाहीर केले. नासिर मुलाणी यांची निवड जाहीर होताचनगरसेवकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला नगराध्यक्ष सुनिल शिंदे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या सह राष्ट्रवादीचे गटनेते ऍड संजय जंगम व महाबळेश्वर गिरिस्थान नगरविकास आघाडीचे गटनेते नगरसेवक कुमार शिंदे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीनंतर नामनिर्देशित सदस्यांच्या दोन जगसाठी निवडीचा कार्यक्रम सुरु झाला राष्ट्रवादी काँग्रेच्यावतीने जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष किसन शिंदे यांचा एक व कुमार शिंदे यांच्या गिरिस्थान नगरविकास आघाडीच्यावतीने सीए मिलिंद ढेबे माजी प्राचार्य कोंडीराम ढाणक व अझरुद्दीन बढाणे यांचे तीन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली होती. नगरसेवक कुमार शिंदे यांनी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक पदाचे उमेदवार किसन शिंदे यांच्या अर्जावर लेखी हरकत घेतल्याचे सांगून या निवडीवर आक्षेप नोंदवला पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुनिलशेठ शिंदे यांनी याबाबत स्वतः निर्णय घ्यावा अशी मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस चे गटनेते ऍड संजय जंगम यांनी बाजू मांडताना उपविभागीय अधिकारी यांनी हा आक्षेप आधीच फेटाळला असल्याचे सांगितले. Nasir Mulani मात्र कुमार शिंदे यांनी याबाबतचा निर्णय स्वतः नगराध्यक्षांनी विचार करून घाव असा सल्ला दिला अखेर नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी कुमार शिंदे यांनी घेतलेले आक्षेप फेटण्याबाबतचा निर्णय दिला व जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष किसन शिंदे यांच्यासह कुमार शिंदे गटाकडून सीए मिलिंद ढेबे यांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती झाल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी जाहीर केले. नूतन स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपाध्यक्ष ज्या समितीचे पदसिध्द सभापती ठरविण्यासह विविध विषय समित्या, समिती सदस्य संख्या ठरविणेबाबतची दोन्ही गटांमध्ये चर्चा पार पडली नूतन उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी,स्वीकृत नगरसेवक किसन शिंदे, सीए मिलिंद ढेबे यांच्या सत्कार सर्व नगरसेवकांच्या उपस्थित पार पडला. पालिकेच्या या पहिल्याच पार पडलेल्या सभेला नगरसेवक अफझल सुतार, विमल पार्टे, कुमार शिंदे, संतोषआबा शिंदे, ऍड संजय जंगम, रोहित ढेबे, स्मिता पाटील, पल्लवी कोंढाळकर, विद्या बावळेकर, राहुल पिसाळ, शबाना मानकर, संगीता वाडकर, नीता झाडे, राजूभाई नालबंद, विमल बिरामणे, रेश्मा ढेबे, प्रियंका वायदंडे, रवींद्र कुंभारदरे, संतोष आखाडे आदींसह पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, अमित माने, एम आर धायगुडे, प्रदीप कुमार बोरगे आदी उपस्थित होते. हे पण वाचा : “मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच लॉटरी” किशोरी पेडणेकर आक्रमक मोठी बातमी! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग! अखेर टी-२० विश्वचषकातून घेतली माघार स्वतः चहा करुन लोकांना दिला आहे का?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोदींना सवाल