Mother’s Day Special Cake Recipe: मदर्स डे हा प्रत्येक आईसाठी प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस मानला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या आईला भेटवस्तू देतात, तिच्यासोबत वेळ घालवतात किंवा तिच्यासाठी काही खास बनवून तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हालाही तुमच्या आईला यंदाच्या मदर्स डे ला खास सरप्राइज द्यायचे असेल, तर घरच्या घरी झटपट तयार होणारे स्वादिष्ट केक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आईच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तुम्ही काही मिनिटांत हे खास केक तयार करू शकता. हे केक बनवायलाही सोपे आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात. चॉकलेट ट्रफल केक (Mother’s Day Special Cake Recipe) जर तुमच्या आईला चॉकलेट आवडत असेल, तर चॉकलेट ट्रफल केक तिच्यासाठी परफेक्ट आहे. डार्क चॉकलेट, बटर आणि क्रीमपासून तयार होणारा हा केक खूपच रिच आणि स्मूद लागतो. वरून चॉकलेट गार्निश केल्यास त्याची चव आणखी वाढते. खास मदर्स डे सेलिब्रेशनसाठी हा केक उत्तम पर्याय ठरू शकतो. फ्रूट केक (Mother’s Day Special Cake Recipe) हेल्दी आणि टेस्टी पर्याय हवा असेल, तर फ्रूट केक नक्की बनवू शकता. स्ट्रॉबेरी, कीवी, डाळिंब, आंबा अशा हंगामी फळांचा वापर करून हा केक तयार करता येतो. हा केक हलका, फ्रेश आणि आरोग्यासाठीही चांगला असतो. फळांमुळे केकला सुंदर रंग आणि नैसर्गिक गोडवा मिळतो. Mother’s Day Special Cake Recipe: मदर्स डे करा खास! आईसाठी घरच्या घरी बनवा हे ५ स्वादिष्ट केक कोकोनट केक नारळाची चव आवडणाऱ्यांसाठी कोकोनट केक एकदम खास आहे. नारळाचे दूध, किसलेला नारळ आणि कोकोनट क्रीम वापरून हा केक तयार केला जातो. त्याची चव खूप वेगळी आणि स्वादिष्ट लागते. साधा पण खास असा हा केक मदर्स डे ला आईसाठी नक्की बनवू शकता. व्हॅनिला स्पॉन्ज केक व्हॅनिला स्पॉन्ज केक हा सर्वांचा आवडता प्रकार आहे. मऊ स्पॉन्ज बेस आणि व्हॅनिलाचा सुगंध यामुळे हा केक अधिक खास वाटतो. वरून व्हीप्ड क्रीम आणि रंगीत स्प्रिंकल्स घालून तुम्ही तो आणखी आकर्षक बनवू शकता. घरच्या घरी सहज तयार होणारा हा केक मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. रेड वेल्वेट केक मदर्स डे ला थोडं खास आणि आकर्षक काहीतरी बनवायचं असेल, तर रेड वेल्वेट केक उत्तम पर्याय आहे. त्याचा लाल रंग आणि क्रीम चीज फ्रॉस्टिंग केकला सुंदर लूक देतात. हा केक पाहताच कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद उमटतो. यंदाच्या मदर्स डे ला महागड्या भेटवस्तूंऐवजी आईसाठी स्वतःच्या हाताने बनवलेला केक तिच्यासाठी सर्वात सुंदर भेट ठरू शकते. कारण आईसाठी प्रेमाने केलेली छोटी गोष्टही खूप खास असते.