Dr Babasaheb Ambedkar: ६ डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाज सुधारक आणि जगभरातील वंचितांसाठी आशा निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस. हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात, अत्यंत भावपूर्ण वातावरणात पाळला जातो. महापरिनिर्वाण दिनाचा ऐतिहासिक संदर्भ 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर 7 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी (दादर) येथे बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार झाले. तेव्हापासून दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला आदरांजली वाहतात. आजही जगभरातून अनुयायी 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर जमून त्यांच्या कार्याची, विचारांची आणि संघर्षाची आठवण जागवतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोक एकमेकांना संदेश, स्टेटस, फोटो पाठवून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात. तुम्हीदेखील खास संदेश शेअर करून महापरिनिर्वाण दिन साजरा करू शकता. महापरिनिर्वाण दिन 2025: विशेष मराठी स्टेटस राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन! सागराचे पाणी आटू शकते, पण भीमांची आठवण कधीच नाही! हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार फेडता येणार नाहीत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम! देशात समता, बंधुता, मानवता नांदावी… यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या बाबासाहेबांना कोटी कोटी आदरांजली! आचार-विचारांत राष्ट्रनिष्ठा भरून टाकणाऱ्या, न्यायासाठी आयुष्यभर लढणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे जनक… परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी मानाचा मुजरा! समाजाच्या उन्नतीसाठी सतत लढणाऱ्या, गरीब-दलितांच्या अधिकारांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली! माणसाला माणूसपण देणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम! डॉ. बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” “धर्म माणसासाठी असावा; माणूस धर्मासाठी नव्हे.” “स्वातंत्र्य, समता आणि बंधुता… यांच्याशिवाय लोकशाही अपूर्ण आहे.” “स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत संघर्ष करा.”