Zubeen Grag : गायक झुबिन गर्गने (Zubeen Garg) लाईफ जॅकेट घालण्यास नकार दिला. तसेच झुबिन (Zubeen Garg) मद्यधुंद होता आणि म्हणूनच तो लाजरस बेटाजवळ बुडाला, असा खुलासा सिंगापूर पोलिसांनी केला आहे. चॅनल न्यूज एशियाच्या वृत्तानुसार, सिंगापूर न्यायालयात सुनावणीदरम्यान मुख्य तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की आसामी गायक झुबिन गर्गने सुरुवातीला लाईफ जॅकेट घातले होते, परंतु नंतर ते काढून टाकले आणि दुसरे लाईफ जॅकेट घालण्यास नकार दिला. तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि अनेक साक्षीदारांनी त्याला बोटीकडे परतताना आणि लाईफ जॅकेटशिवाय पोहण्याचा प्रयत्न करताना पाहिले, तेव्हा तो बेशुद्ध पडला आणि त्याचा चेहरा पाण्याखाली गेला.अहवालात असेही म्हटले आहे की, गायकाला ताबडतोब पुन्हा बोटीकडे आणण्यात आले आणि सीपीआर देण्यात आला, परंतु काही वेळातच त्याला मृत घोषित करण्यात आले. गायक झुबिन गर्गची शेवटची इच्छा काय होती? पत्नी गरिमा गर्ग ती खंत व्यक्त करत म्हणाल्या “सध्या माझ्या आयुष्याचा…” न्यायालयाला असेही सांगण्यात आले की गर्ग यांना उच्च रक्तदाब आणि अपस्माराचा त्रास होता आणि त्यांना शेवटचा झटका २०२४ मध्ये आला होता. सिंगापूर पोलिसांनी या मृत्यूमागे कोणताही गैरप्रकार असण्याची शक्यता नाकारली आहे. दरम्यान, झुबिन गर्ग १९ सप्टेंबर २०२५ रोजी एका यॉट पार्टीमध्ये होते, तेव्हा सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण करण्याच्या एक दिवस आधी बुडुन मृत्यू झाला होता.