Tamil Nadu: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विधानसभेत बोलताना राज्यपाल आर.एन. रवी यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपाल द्रविड मॉडेल सरकारच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेच्या कामकाजादरम्यान स्टॅलिन म्हणाले की, तामिळनाडूने (Tamil Nadu) इतर राज्यांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी केली आहे. कल्याणकारी योजनांची सातत्याने अंमलबजावणी केल्यामुळे राज्याचा विकास वेगाने झाला आहे. एवढे यश मिळाल्यानंतर त्याहून मोठे यश मिळवणे हे द्रविड मॉडेल सरकारचे वैशिष्ट्य आहे, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले. आज मी आनंदी आहे, कारण जनता आनंदी आहे – राज्यपालांच्या वर्तनावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यपाल वारंवार विधानसभेत व्यत्यय आणतात आणि त्याच कारणांवरून सभागृहातून बाहेर पडतात. मी देशाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणारा माणूस आहे. आम्हाला देशभक्तीचे धडे देण्याची गरज नाही. M K Stalin विधानसभेत सुरुवातीला ‘तामिळ थाई वाझथू’ आणि शेवटी राष्ट्रगीत गाण्याची परंपरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या पहिल्या कार्यकाळाबद्दल बोलताना स्टॅलिन म्हणाले की, सत्ता मिळाल्याचा आनंद होता, पण मागील सरकारच्या काळात निर्माण झालेल्या समस्यांमुळे जबाबदारीची जाणीवही होती. आज मी आनंदी आहे, कारण जनता आनंदी आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या प्रमुख योजनांची माहिती दिली. यात महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना, कलाईनार मगळीर उरिमाई थोगई अंतर्गत मासिक आर्थिक मदत, ३,००० रुपयांची पोंगल मदत, पेन्शन योजना आणि १० लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण यांचा समावेश आहे. तसेच कलाईनार शताब्दी ग्रंथालय, किळंबक्कम बस टर्मिनस, रस्ते, पाणीपुरवठा आणि बंधारे प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. राज्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केल्याचेही त्यांनी सांगितले. हेही वाचा – Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण; दोषमुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर