Rahul Gandhi : केंद्र सरकारने मनरेगा कायदा रद्द करून त्याऐवजी आणलेला नवीन कायदा हा शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या तीन काळ्या कायद्यांप्रमाणेच अन्यायकारक आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एकजुटीने सरकारला झुकवून ते कायदे मागे घ्यायला लावले, त्याचप्रमाणे देशातील गरीब आणि कामगारांनी संघटित होऊन मनरेगा पुनर्स्थापित करण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी गुरुवारी केले. रचनात्मक काँग्रेसतर्फे आयोजित राष्ट्रीय मनरेगा कामगार संमेलनात राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल आणि संदीप दीक्षित उपस्थित होते. या संमेलनासाठी देशभरातील कामगारांनी आपल्या कामाच्या ठिकाणची मूठभर माती आणली होती, जी एका रोपाला अर्पण करून आंदोलनाचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारवर कडाडून टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मनरेगा ही केवळ रोजगाराची योजना नव्हती, तर तो गरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा कायदा होता. हा कायदा पंचायत राज व्यवस्थेद्वारे राबवला जात असल्याने स्थानिक जनतेचा त्यात आवाज होता. मात्र, मोदी सरकारने आणलेल्या नवीन व्हीबी-जीआरएएम-जी कायद्यामुळे कामगारांचे सर्व अधिकार संपुष्टात आले आहेत. Rahul Gandhi आता केंद्रात बसलेले सरकार ठरवणार की कोणत्या राज्याला किती निधी द्यायचा आणि काम कुठे होणार. यामुळे भाजपशासित राज्यांना झुकते माप मिळेल आणि विरोधी पक्षांच्या राज्यांवर अन्याय होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी असा आरोप केला की, या नवीन व्यवस्थेमुळे गरीब कामगारांचा हक्क आता कंत्राटदार आणि नोकरशहांच्या खिशात जाणार आहे. देशातील सर्व संपत्ती मोजक्या उद्योगपतींच्या हातात एकवटणे, हाच भाजपचा खरा अजेंडा आहे. दलित, ओबीसी आणि आदिवासींना श्रीमंतांवर अवलंबून ठेवण्याचे हे कारस्थान असून ही संविधानावर केलेली थेट पायमल्ली आहे. ज्याप्रमाणे नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेला जीएसटी हे संविधानावरील हल्ले होते, तसाच हा नवीन कायदा असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी आंदोलनाचा आदर्श समोर ठेवा … पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना ते म्हणाले की, भाजपला लोकशाही आणि एक व्यक्ती-एक मत ही संकल्पना मोडीत काढून देशाला पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळातील राजांच्या राजवटीकडे न्यायचे आहे. मात्र, जर देशातील गरीब आणि कामगार एकत्र आले, तर सरकारला नक्कीच नमवता येईल. शेतकऱ्यांनी मार्ग दाखवला आहे, आता कामगारांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. जर आपण एकजूट दाखवली, तर मोदी सरकारला पाऊल मागे घ्यावेच लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने १० जानेवारीपासून ‘मनरेगा बचाओ संग्राम ही ४५ दिवसांची देशव्यापी मोहीम सुरू केली असून, मनरेगा कायदा त्याच्या मूळ स्वरूपात पुन्हा लागू करण्याची मागणी लावून धरली आहे. हे पण वाचा : Cigrette Banned : विडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट सर्वांवर बंदी ; ‘या’ राज्याने घेतला धक्कादायक निर्णय भाजप आणि एमआयएमची युती; कट्टर विरोधक असलेल्या पक्षांची एकमेकांना साथ Sai Pallavi: साई पल्लवी बोल्ड कपडे का घालत नाही? कॉलेजमधील त्या एका घटनेनं बदललं आयुष्य