Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हरियाणाच्या मदिना गावातील शेतकरी संजय मलिक यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून दिलेला शब्द पाळला. जुलै २०२३ मध्ये राहुल गांधी यांनी अचानक या गावाला भेट देऊन संजय यांच्या शेतात भात लावणी केली होती. त्यावेळी त्यांनी (Rahul Gandhi) कुटुंबाच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचे आश्वासन दिले होते. पांढरा टी-शर्ट आणि पॅन्ट अशा साध्या वेशात आलेल्या राहुल गांधींचे खासदार दीपेंदर हुडा व ग्रामस्थांनी स्वागत केले. मलिक कुटुंबाने त्यांचा सन्मान म्हणून डोक्यावर पारंपरिक पगडी बांधली. Rahul Gandhi Rahul Gandhi राहुल यांनी लग्नातील पदार्थांचा आस्वाद घेत कुटुंबाशी संवाद साधला. काँग्रेसने या भेटीचे फोटो शेअर करत त्यांचा उल्लेख जननायक असा केला आहे. जेथे इतर नेते उद्योगपतींच्या लग्नांना प्राधान्य देतात, तिथे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एका शेतकऱ्याच्या मुलीचे कन्यादान करून आपले वचन पूर्ण केले, अशी प्रतिक्रिया दीपेंदर हुडा यांनी दिली. Rahul Gandhi