Massive explosion outside BJP office : चंदीगडमध्ये आज दुपारी एक मोठी घटना घडली आहे. सेक्टर ३७ मधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यालयाबाहेर स्फोट (Massive explosion outside BJP office) झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लोकांमध्ये घबराट पसरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी स्फोटाचा (Massive explosion outside BJP office) मोठा आवाज दूरवर ऐकू आला. स्थानिक रहिवासी आणि भाजपा कार्यकर्ते यामुळे भयभीत झाले. स्फोटाच्या ठिकाणी धूर आणि धक्का जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. Massive explosion outside BJP office घटनेची माहिती मिळताच (Massive explosion outside BJP office) चंदीगड पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम सध्या तपास करत आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात तो बॉम्ब स्फोट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबान्या घेण्याचे काम सुरू आहे.