Shivraj Singh Chouhan : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार केंद्र सरकारच्या योजनांची राज्यात अंमलबजावणी करत नसल्याने बंगालमधील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा थेट आरोप केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मंगळवारी केला. त्यांनी लोकसभेत बोलताना, बंगाल सरकार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना चौहान म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने चांगल्या योजना आमलात आणत आहेत. याचा फायदा देशातील इतर शेतकऱ्यांना होत असला, तरी बंगालमधील शेतकरी या फायद्यांपासून दूर आहेत. पश्चिम बंगाल सरकार पंतप्रधान धन धान्य कृषी योजना आणि इतर महत्त्वाच्या योजना राज्यात लागूच करत नाही. Shivraj Singh Chouhan राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणाशी ममता बॅनर्जींच्या सरकारला देणेघेणे नाही. योजना राबवण्यास नकार देऊन हे सरकार पाप करत असल्याचा आरोप चौहान यांनी केला. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसवर नीच राजकारण करत असल्याचा आरोपही केला. Shivraj Singh Chouhan संसदेत घोषणाबाजी करणारे लोक प्रत्यक्ष बंगालमध्ये मात्र शेतकऱ्यांना लाभांपासून वंचित ठेवत असल्याचे त्यांनी बोलताना नमूद केले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थिती बदलेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी देशात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ओळखपत्रे तयार करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही सभागृहाला दिली.