Ajay Sharma : पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी जर कोणी कोणताही उपद्रव किंवा घातपात केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नंतर पश्चात्ताप करू नका, असा सज्जड दम उत्तर प्रदेशचे धाडसी आणि तडफदार पोलीस अधिकारी अजयपाल शर्मा (Ajay Sharma) यांनी पश्चिम बंगालमधील दंगेखोरांना दिला आहे. अजयपाल शर्मा यांचा समाज माध्यमांतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शर्मा (Ajay Sharma) म्हणाले, हे स्पष्टपणे समजून घ्या की, जर कोणी गैरवर्तन केले, तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. जर कुठूनही अशी बातमी आली की कोणीतरी खोडसाळपणा केला आहे किंवा कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तृणमूल काॅंग्रेसचे उमेदवार जहांगीरच्या कुटुंबानेही हे ऐकले पाहिजे. त्यांना कळवा, नंतर रडू नका किंवा पश्चात्ताप करू नका. अजयपाल शर्मा (Ajay Sharma) हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी आहेत. आयपीएसमध्ये सामील होण्यापूर्वी ते एमबीबीएस डॉक्टर होते. ऑपरेशन क्लीन राबवणाऱ्या उत्तर प्रदेशातील गतिमान अधिकाऱ्यांमध्ये अजयपाल शर्मा यांची गणना होते. Ajay Sharma शर्मा यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक चकमकी झाल्या असून, त्यात अनेक कुख्यात गुन्हेगार मारले गेले आहेत. नोएडाचे एसएसपी म्हणून त्यांच्या कार्यकाळात अनेक पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना धडा शिकवला गेला. अजयपाल शर्मा यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्यांना काही काळ प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले होते आणि त्यांच्यावर दक्षता चौकशी झाली होती. सध्या ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये त्यांना डीआयजी पदावर पदोन्नती मिळाली. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना सन्मानितही करण्यात आले. तृणमूल काँग्रेसनेही अजयपाल शर्मा यांच्या या व्हिडिओवर तीव्र टीका केली आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, असे पक्षाचे म्हणणे आहे.