ZP Election : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये (ZP Election) लातूर जिल्ह्यातील निकालांनी चांगलाच थरार निर्माण केला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या (ZP Election) ५९ जागांपैकी ५२ जागांचे निकाल जाहीर झाले असून, काँग्रेसने सर्वाधिक १९ जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपली मजबूत स्थिती दाखवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप १७ जागांसह आहे, तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी १० जागांवर विजयी झाली आहे. इतर पक्षांची स्थिती अशी आहे: – एकनाथ शिंदे गटाची शिवसेना: १ जागा – उद्धव ठाकरे गटाची शिवसेना: १ जागा – शरद पवार गटाची राष्ट्रवादी: १ जागा – मनसे: १ जागा – अपक्ष: २ जागा ZP Election काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष असला तरी, बहुमतासाठी (साधारण ३० जागांची गरज) भाजपला राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना आणि अपक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासू शकते. उर्वरित जागांच्या निकालानंतर (ZP Election) आणि अपक्षांच्या भूमिकेवर सत्तेचे गणित ठरेल. कुटुंबातीलच थरारक लढत लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी लढत झाली. काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी आपली भावजय सरिता भिसे यांचा केवळ 2 मतांच्या फरकाने पराभव केला. ही लढत कुटुंबातीलच राजकीय स्पर्धा म्हणून चर्चेत राहिली. या निकालामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. आशाताई भिसे यांच्या विजयाने काँग्रेसला या गटातून मजबूत आधार मिळाला आहे. संभाजी नगर तालुक्यात एका मताने थरारक विजय छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या एकाच मताने विजय मिळवला. त्यांनी हनुमंत भोंडवे यांचा पराभव केला. विजयानंतर सचिन गरड यांचे भावूक होऊन अश्रू अनावर झाले. “वाळू माफिया आणि ताकदवान उमेदवारांच्या विरोधात लढलो. जनतेने सामान्य व्यक्तीला निवडून दिले, त्यांचे मी आभार मानतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे, पराभूत हनुमंत भोंडवे यांनी म्हटले, “पराभव मान्य करतो. एका मताने का होईना, पराभव असतोच. आज त्या एका मताची किंमत मला कळली.”