Nashik Municipal Corporation Election Results। नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपासह मनसे, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. यावेळी पालिकेवर आपलाच उमेदवार महापौर होणार असा दावा सर्वच पक्षाकडयन करण्यात आला होता. दरम्यान, नाशिकच्या महापालिकेत मनसेचे इंजिन पुन्हा धावणार का भाजपाचे कमळ फुलणार? हे काही वेळातच समजणार आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये १२२ प्रभाग आहेत, महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत आवश्यक असते. २०२६ ची निवडणूक पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता आणि शहरी विकास या मुद्द्यांबरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फुटीनंतरची राजकीय परिस्थिती यामुळेही विशेष चर्चेचा विषय ठरली. नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांमध्ये १२२ जागा आहेत. नाशिकच्या जनतेची सेवा करण्यासाठी ७३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यातील काही प्रभागांमधील लढती अतिशय चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. Nashik Municipal Corporation Election Results।