Tukaram Mundhe Mother Passed Away : ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे (Tukaram Mundhe Mother Passed Away) यांचे पुण्यात निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या शंभरच्या आसपास असलेल्या आसराबाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव (Tukaram Mundhe Mother Passed Away) बीड जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी ताडसोना येथे नेण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ताडसोना येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे सध्या कामानिमित्त पश्चिम बंगालमध्ये होते. आईच्या निधनाची बातमी कळताच ते तातडीने पुण्याकडे रवाना झाले आहेत. मुंढे कुटुंबीयांनी सांगितले की, आसराबाई यांचे वय सुमारे १०० वर्षे होते. ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे कडक अधिकारी तुकाराम मुंढे हे २००५ च्या IAS तुकडीतील अधिकारी आहेत. प्रशासकीय वर्तुळात त्यांना ‘सिंघम’ या नावाने ओळखले जाते. त्यांची कार्यशैली अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कठोर म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या २४ वेळा बदल्या झाल्या आहेत. या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. Tukaram Mundhe | नुकतीच त्यांची पुन्हा एकदा बदली झाली असून, दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून त्यांची मंत्रालयात प्रधान सचिव (Principal Secretary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकाळात केलेली उल्लेखनीय कामगिरी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम करताना तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe Mother Passed Away) यांनी अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली आणि विभागातील दीर्घकाळ चालत आलेल्या अनियमितता उघडकीस आणल्या. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नियंत्रण, शिस्त पाळणे आणि राजकीय दबावाला बळी न पडता निश्चित धोरण राबवणे ही त्यांची खासीयत आहे. त्यांच्या या कठोर पण न्याय्य कार्यशैलीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह अनेकांना त्यांच्याकडून न्याय मिळाला आहे. पारदर्शकता आणि शिस्त यांना प्राधान्य देणाऱ्या मुंढे यांच्या कार्यपद्धतीला प्रशासकीय क्षेत्रात विशेष मान्यता आहे.