Avinash Jadhav | राज्यातील महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरुन मोठा वाद निर्माण झाला. यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला. याप्रकरणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी याचिका जाहीर केली होती. मात्र अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी, ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले. तसेच यात रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे सांगितले. मात्र यामध्ये काहीही साम्य आढळून आले नसल्याचे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद यावर मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. “तुम्ही चुकीची वक्तव्य करत आहात. चुकीच्या मुद्द्यांवर तुमचा युक्तिवाद आहे. ही याचिका इतर याचिकांसारखीच असल्याचे चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावून ही याचिका फेटाळणार आहोत. तुम्ही चुकीचे विधान का केले? एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई किंवा भीती काय होती?,” असा सवाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. Avinash Jadhav | 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने खळबळ दरम्यान, राज्यात पहिल्यांदाच 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमदेवारांवर दबाव टाकून आणि लालच देऊन त्यांना अर्ज माघारी घ्यायला सांगण्यात आले. त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या बिनविरोध निवडीला मनसेने नुसता विरोध केला नाही तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी थेट हायकोर्टात धाव घेऊन बिनविरोध निवडीला आव्हान दिलं होतं. Avinash Jadhav | हेही वाचा: Weight Loss: वजन कमी करण्याचा रामबाण उपाय! रोज फक्त १ ग्लास कोमट लिंबूपाणी, पण योग्य पद्धत जाणून घ्या