Nitin Gadkari | भाजपची विचारधारा ही जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी काम करण्याची शिकवण देते आणि ती मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. नागपूर महानगरपालिकेच्या १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचारसभा घेताना ते बोलत होते. भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळाल्यास नागपूरकरांच्या आशा पूर्ण होतील आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या कामगिरीची जबाबदारी मी स्वतः घेईन, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही, आम्ही दहशतवाद आणि पाकिस्तानच्या विरोधात आहोत. देशासाठी बलिदान देणारे मुस्लिम आम्हाला हिंदूंप्रमाणेच प्रिय आहेत, असे त्यांनी नमूद केले. Nitin Gadkari | भाजपची विचारधारा भेदभाव न करता सर्व घटकांसाठी काम करण्याची आपण कट्टर कार्यकर्ता असलो तरी मतदान करणाऱ्या व मतदान न करणाऱ्या सर्वच लोकांचे प्रतिनिधी आहोत. भाजप संविधान बदलू इच्छितो, हा आरोपही गडकरी यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आतापर्यंत ८० वेळा संविधानात दुरुस्ती केली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. Nitin Gadkari | काही विरोधी नेते भाजप सत्तेवर आल्यास हिंसाचार होईल, असा गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपची विचारधारा कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांसाठी काम करण्याची आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हेही वाचा: Hair Care Tips: हिवाळ्यात केस गळणे आणि कोरडेपणामुळे त्रस्त आहात? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी