महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा नवापूरचे माजी आमदार सुरुपसिंग नाईक यांचे २४ डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील काँग्रेस पक्ष आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सुरुपसिंग नाईक हे इंदिरा गांधी आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जात होते. पक्षाचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ख्याती होती. १९७० ते २०१९ पर्यंत जवळपास पाच दशके राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नाईक यांनी आणीबाणीनंतर काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहोचवली आणि पक्षाला आदिवासीबहुल भागात मजबूत केले. आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शिक्षण आणि विकासाच्या कामात त्यांचा मोठा वाटा होता. राज्यातील समाजकार्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभेत प्रवेश केला होता. माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांची राजकीय कारकीर्द नवापूर सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारलं. आदिवासी युवकांना शिक्षणाचा प्रवाहात आणलं आदिवासीबहुल भागात एमआयडीसीची स्थापना करून रोजगाराच्या संधी उपलब्ध कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. 19 72 ते 1981 मध्ये त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदारकी निभावली होती. 1981 ला खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला होता. 1981 मध्ये त्यांनी आदिवासी विकास समाज कल्याण मंत्रीपद भुषवले होते. 1981 ते 82 मध्ये त्यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची सदस्यता निभावली होती. 1982 नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांची बिनविरोध विधानसभेवर निवड झाली होती. 1982 ते 2009 सलग महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य 1982 पासून 2009 पर्यंत आदिवासी विकास विभाग वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन परिवहन विभागाचे मंत्रीपदही त्यांनी भूषविले होते. 2009च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 विधानसभा निवडणुकीत पुन्हा नवापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी 2019 निवडणुकीत राजकारणातून बाजूला होत मुलगा शिरीष कुमार नाईक यांना नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार केलं होतं. सुरुपसिंग नाईक यांचे उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या विकासातील योगदान नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, अंत्यसंस्कार गुरुवारी नवापूर तालुक्यातील सुटी गावी सकाळी 11 वाजता होणार आहेत.