Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना अखेर पायउतार व्हावे लागले आहे. नाशिक येथील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका झाली. खरातसोबतच्या फोटो, व्हिडिओ आणि पाद्यपूजा करतानाच्या छायाचित्रांमुळे वाद वाढला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर (Rupali Chakankar) यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले, ज्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. रुपाली चाकणकर यांची २०२१ मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. २०२४ मध्ये त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाही राज्य सरकारने त्यांची पुन्हा नियुक्ती केली. मात्र, त्यांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका होत राहिली. Rupali Chakankar विशेषतः पुण्यातील तीन राजकीय महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे शहराच्या कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे, शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगिता तिवारी यांनी समाजमाध्यमे, पत्रकार परिषदा आणि आंदोलनांच्या माध्यमातून चाकणकर यांच्यावर आक्रमक टीका केली. Rupali Chakankar Rupali Chakankar या तीन महिलांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, पुण्यातील वैष्णवी हगवणे विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. वैष्णवी हगवणे प्रकरणात चाकणकर यांनी त्वरित दखल न घेतल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली. चाकणकर आणि पाटील दोघी एकाच पक्षात असूनही हा वाद वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचला. पाटील यांना पक्षातून शिस्तभंगाची नोटीस मिळाली, तरी त्या मागे हटल्या नाहीत. अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर या तीन रणरागिणींनी तीव्र आंदोलन केले. सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. खरातच्या सांगण्यावरून त्या काळी जादू आणि तंत्र-मंत्र करत असल्याचा, सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिका कापल्याचा दावा केला. संगिता तिवारी यांनी ‘गुलाबो गँग’ आणि ‘बिटिया फाउंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून आंदोलने केली आणि राजीनाम्याची मागणी केली. खरात प्रकरणात व्हायरल झालेल्या छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीतींमुळे चाकणकर यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. खरातला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. विरोधकांसह चाकणकर यांच्याच पक्षातील नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार चाकणकर यांनी पद सोडले. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, पुण्यातील या तीन महिलांच्या सातत्यपूर्ण आंदोलन आणि टीकेमुळे चाकणकर (Rupali Chakankar) यांना राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षपदावरील नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे.